

Uddhav Thackeray
ESakal
मुंबई : राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक रविवारी त्यांच्या आपल्या 'मातोश्री' निवासस्थानी बोलावली आहे. काही दिवसांपासून 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी बोलावलेल्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे.