ठाकरे गटातील नेत्याला मारण्यासाठी चोरबाजारातले चॉपर अन् देशी पिस्तुलचा वापर, प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर!

Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी देशी पिस्तुल, तर हल्ल्यासाठी चोरबाजारातून विकत घेतलेले चॉपरचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे.
Pradeep Purnekar Case

Pradeep Purnekar Case

ESakal

Updated on: 

ठाणे : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली दोन्ही देशी पिस्तुले उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आली होती, तर हल्ल्यासाठी वापरलेले चॉपर मुंबईतील चोरबाजारातून विकत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. या तीन चॉपरची एकूण किंमत २०० ते २५० रुपये असल्याची माहिती आरोपींनी तपासादरम्यान दिल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com