उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आज षण्मुखानंदमध्ये सोहळा पार पडत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केले आहे. यावेळी त्यांनी भाषणाची सुरूवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो... अशा शब्दात केले. यानंतर कार्यकरर्त्यांनी मोठा जयघोष केला. यानंतर त्यांनी जोरदार फटकेबाजी सुरू केली आहे. त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तर अनेक काळापासून सुरू असलेल्या राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.