"पहले मंदिर, फिर सरकार' 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

मुंबई -  ""हर हिंदू की यहीं पुकार, पहले मंदिर, फिर सरकार।'' असा नवा नारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (ता.18) दिला आहे. "चलो अयोध्या' अभियानाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची रविवारी शिवसेना भवनात बैठक घेतली. सरकारपेक्षाही राम मंदिर महत्त्वाचे आहे, या सेनेच्या नव्या धोरणामुळे युतीसाठी मंदिराचे आश्‍वासन अशी अट ते भाजपसमोर ठेवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याविषयी आज प्रथमच पदाधिकाऱ्यांशी बोलताना उद्धव यांनी सरकारपेक्षाही हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेला महत्त्वाचा असल्याचे संकेत दिले.

शिवसेनेच्या नव्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करणे टाळले. मात्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेची भूमिका अशी असेल, तर ते सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेत नाहीत, असा प्रश्‍न केला. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला या संदर्भातील भूमिकेविषयी विचारले असता, हा विषय न्यायप्रविष्ठ आहे, एवढेच उत्तर त्यांनी दिले. 

Web Title: Uddhav Thackeray's new announcement First temple then government