भाजपचा घाव शिवसेनेच्या वर्मी लागला?

विष्णू सोनवणे
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई : 'मातोश्री'च्या मालमत्तेचा मुद्दा उपस्थित करत भाजपने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. हा घाव शिवसेनेच्या वर्मी लागला आहे. मालमत्तेचा हा मुद्दा सरकारच्या स्थैर्याच्या मुळावर येण्याची दाट शक्‍यता असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

नोटाबंदीच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट संपत्ती जाहीर करण्याचे आव्हान दिले. 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर एकही शिंतोडा उडालेला नाही. माझी स्थावर मालमत्ता किती आहे, हे प्रसारमाध्यमांपुढे मांडले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. 

त्यापाठोपाठ भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही सात कंपन्यांचा संदर्भ देत या कंपन्यांशी ठाकरे यांचा संबंध काय, असा सवाल केला होता. त्याबाबत खुलासा करण्याचे, तसेच हिंमत असल्यास मालमत्ता जाहीर करण्याचे आव्हानही त्यांनी दिले होते. त्यावर आधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती जाहीर करा, मग आम्ही मालमत्ता जाहीर करू, असे उत्तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिले. त्यावर अमित शहा यांनी आपल्या संपत्तीचा तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला दिला असल्याचे प्रत्युत्तर देत भाजपने शिवसेनेला खिंडीत पकडले आहे. 

प्रचारातील मालमत्तेचा मुद्दा शिवसेना-भाजपमध्ये अधिक दुरावा निर्माण करणारा ठरत आहे. शिवसेना पदाधिकारी तर सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे सरकारच्या स्थैर्यालाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेना करणार सरकारची कोंडी 
हिंमत असल्यास मातोश्रीच्या मालमत्तेची चौकशी करूनच दाखवा, असे आव्हान शिवसेनेने भाजपला दिले आहे. चौकशीच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्याची शिवसेनेची रणनीती आहे. चौकशी करण्याचा प्रयत्न झाल्यास ते भाजपसाठी अडचणीचे ठरेल, अशी चर्चा शिवसेनेत आहे.

Web Title: Uddhav Thackray Devendra Fadnavis Mumbai Matoshri corruption