तुमचं विद्यापीठ बोगस तर नाहीये ना ? चेक करा फेक विद्यापीठांची महत्त्वाची यादी

तेजस वाघमारे
Thursday, 8 October 2020

देशातील प्रत्येक विद्यापीठाला यूजीसीची मान्यता घेणे बंधनकारक आहे.

मुंबई : देशातील मान्यता नसलेल्या म्हणजेच फेक विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून म्हणजेच यूजीसी ने जाहीर केलेली आहे.मान्यता नसलेल्या देशातील तब्बल 24 विद्यापीठांची नावे यूजीसीकडून जाहीर करण्यात अली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 8 संस्थांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका संस्थेचा यामध्ये उल्लेख आहे.

देशातील प्रत्येक विद्यापीठाला यूजीसीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. यूजीसी कायदा 1956 अंतर्गत कलम 22(1) नुसार केंद्र, राज्य आणि प्रांतातील शैक्षणिक संस्थांना विद्यापीठाची मान्यता देण्यात आली आहे. तर कलम 3 नुसार डिम्ड विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यूजीसी कायद्याच्या कलम 23 अंतर्गत ‘विद्यापीठ’ ही पदवी लावणे गुन्हा ठरवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना या मान्यता नसलेल्या विद्यापीठांची माहिती व्हावी यासाठी यूजीसीकडून देशातील 24 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आठ विद्यापीठे आहेत.

महत्त्वाची बातमी : तब्बल ९ अटींवर रिया चक्रवर्तीला झाला जामीन मंजूर, अटींची पूर्तता न झाल्यास रद्द होऊ शकतो जामीन

त्याखालोखाल दिल्लीमध्ये सात, पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये प्रत्येकी दोन आणि कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक विद्यापीठ बोगस असल्याची माहिती यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

देशातील 24 बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही यूजीसीकडून करण्यात आले.

मान्यता नसलेल्या विद्यापीठांची नावे

उत्तर प्रदेश

 • वारणसेय संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी
 • महिला ग्राम विद्यापीठ, इलाहाबाद
 • गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग
 • नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर
 • नेताजी सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी, अलिगढ
 • उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, मथुरा
 • महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगढ
 • इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, नोएडा

दिल्ली

 • कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरिया गंज
 • युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
 • वॉकेशनल युनिव्हर्सिटी
 • ए.डी.आर.- सेन्ट्रिक जुरीडीकल युनिव्हर्सिटी
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंग
 • विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट
 • आध्यात्मिक विश्वविद्यायल

महत्त्वाची बातमी : रियाच्या जामीन प्रकरणात न्यायालयाचे NCBला खडेबोल,  कायद्यापुढे सर्वजण सारखेच असतात
 

ओडिसा

 • नव भारत शिक्षा परिषद, राउर केला
 • नॉर्थ ओडिसा युनिव्हर्सिटी ऑफ अग्रिकल्चर अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी, मयूरभंज

पश्चिम बंगाल

 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसिन, कोलकाता
 • इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टनेटिव मेडिसिन अ‍ॅण्ड रिसर्च, कोलकाता

कर्नाटक

 • बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी

केरळ

 • सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णाटम

महाराष्ट्र

 • राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर

पुद्दुचेरी

 • श्री बोधि अ‍ॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन, थीलासपेट

आंध्र प्रदेश

 • क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर जो

( संपादन : सुमित बागुल )

UGC has issued a list of fake universities across india check full list here


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UGC has issued a list of fake universities across india check full list here