
Mumbai Latest News: तहाव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाने २६/११ हल्ल्यात सहभागी अन्य आरोपी, पुरावा आणि नव्या तपशिलांवर प्रकाशझोत पडेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ आणि सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.
लष्कर ए तोयबा किंवा अन्य दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) यांच्यातील सख्य, नाजूक संबंध राणाविरोधात चालणाऱ्या खटल्यातून पुन्हा एकदा जगासमोर येतील.