
उल्हासनगर : "हा पूल कधीही कोसळेल!" असा इशारा नागरिक उल्हासनगर महापालिकेला वर्षानुवर्षे देत होते, आणि शनिवारी रात्री मुसळधार पावसात तोच इशारा भयंकर सत्यात उतरला. उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील गणेशनगर परिसरातील नाल्यावर असलेला पूल पूर्णतः कोसळला. या दुर्घटनेची थरारक दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली असून, या पुलावरून जाणाऱ्या एका महिलेचा आणि लहान मुलाचा जीव थोडक्यात वाचला.