
नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर (वार्ताहर): अवकाळी पावसाच्या सरींनी शहरात आगमनाची चाहूल दिली असतानाच, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुयारी गटार योजनेच्या नावाखाली सुरू असलेल्या बेफिकीर खोदकामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी निर्णायक पाऊल उचलले आहे.