esakal | उल्हासनगर: विनापरवाना फटाके विक्रेत्यांवर कारवाई | Fireworks
sakal

बोलून बातमी शोधा

Fireworks

उल्हासनगर: विनापरवाना फटाके विक्रेत्यांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : शहरात बाजारपेठेत फटाके विक्री (Fireworks) करणाऱ्या अनेक दुकानदारांकडे (shopkeepers) परवाना नसल्याचा (no license) आणि आग प्रतिबंधक यंत्रणेचा अभाव असल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेने (Ulhasnagar municipal) केलेल्या सर्वेक्षणात (survey) उघड झाला. या दुकानांना पालिकेने नोटिसा (notice) बजावल्या असून, एका दुकानदाराकडून ५० हजार रुपयांचा दंडही (fine) वसूल केला आहे.

हेही वाचा: नवी मुंबई: दिघावासीयांची पाण्याची चिंता मिटणार

पालिकेचे मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके, उपअधिकारी कुशवाह यांनी नेहरू चौकातील तीन आणि भाजी मार्केटमधील एका फटाके विक्री करणाऱ्या दुकानाचे सर्वेक्षण केले. त्यांच्याकडे परवाना नसल्याचे उघड झाले. एकाकडे आग प्रतिबंधक यंत्रणाही नसल्याचे समोर आले. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. चारही दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

loading image
go to top