esakal | नवी मुंबई: दिघावासीयांची पाण्याची चिंता मिटणार | Digha
sakal

बोलून बातमी शोधा

barvi dam

नवी मुंबई: दिघावासीयांची पाण्याची चिंता मिटणार

sakal_logo
By
शरद वागदरे

वाशी : नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai municipal) क्षेत्रामधील दिघा (Digha) विभाग, तसेच टीटीसी औद्योगिक क्षेत्राला एमआयडीसीकडून (MIDC) येणाऱ्या बारवी धरणाचे (Barvi Dam) पाणी मिळते. मात्र, जलवाहिनी जीर्ण (old pipeline) आणि नादुरुस्त असल्यामुळे धरणातून पाणी सोडल्यानंतर काटई ते देसाई नाक्यापर्यंत ती फुटते. त्यामुळे नवी मुंबईकरांना दोन ते तीन दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागते. त्यावर पर्याय म्हणून एमआयडीसीकडून काटईपासून शिळफाटापर्यंत जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे

आतापर्यंत तीन किलोमीटर जलवाहिनीचे काम झाले असून, ८.३० किलोमीटर काम प्रगतिपथावर आहे. हे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून दिघावासीयांच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. दिघापर्यंत अद्याप नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाची जलवाहिनी पोहोचलेली नाही. पाणी साठवण करण्यासाठी उच्चस्तरिय आणि भूमिगत पाण्याच्या टाक्याही महापालिकेने बांधल्या नसून, त्याचे काम नुकतेच सुरू केले आहे.

त्यामुळे नवी मुंबईतील दिघा व एमआयडीसी परिसराला बारवी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीची काटई नाक्यापासून शिळफाट्यापर्यंत जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी ३५ वर्षांपूर्वी टाकण्यात आली होती. मात्र, नागरिकरणामुळे रस्ते, घरे उंच झाले आणि जलवाहिनी जमिनीखाली गाडली गेली. आता तर ती जीर्ण झाल्याने वर्षभरात ९ ते १० वेळा फुटत असते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

हेही वाचा: नवी मुंबईत ४८ तास पाणीपुरवठा खंडित

सध्या नवी मुंबई महापालिकेला ७० एमएलडी पाणी देण्यात येते. एमआयडीसीकडून काटईपासून शिळफाटापर्यंत जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत तीन किलोमीटर जलवाहिनीचे काम झाले असून, ८.३० किलोमीटर काम प्रगतिपथावर आहे. त्यातून जोडणी द्यायची आहे. हे काम करण्यासाठी ६३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

सध्या काटईपासून शिळफाट्यापर्यंतच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून येत्या मार्च महिन्यापर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण कमी होईल. जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे दर शुक्रवारी शटडाऊन घेण्यात येत आहे. हा शटडाऊन २४ तासांसाठी घेण्यात येतो. ऑक्टोबर महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत दहा वेळा एमआयडीसीकडून शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांची गैरसाय दूर होऊन त्यांची सुटका होणार आहे.

पाणीपुरवठा ठप्प

एमआयडीसीच्या मालकीच्या बारवी धरणातून सुरू होणारी जलवाहिनी ही कल्याण-डोंबिवली, शिळफाटा, नवी मुंबई, ठाणे महापालिका येथून मिरा भाईंदरपर्यंत जाते. ही जलवाहिनी फुटल्‍यानंतर शिळफाटा, नवी मुंबई व ठाणे महापालिका क्षेत्र आणि मिरा भाईदर येथील पाणीपुरवठा ठप्प होतो. पण, ठाणे व मिरा भाईदरला दुसऱ्या धरणातूनही पाणी मिळते. त्यामुळे त्यांची कमी प्रमाणात गैरसोय होते. दिघावासीयांना मात्र याच धरणातून पाणी येते. त्यामुळे प्रचंड गैरसोय होत असते.

loading image
go to top