Ulhasnagar Crime : कल्याण पूर्वेच्या शिवसेना शहरप्रमुखावर 5 कोटी खंडणीच्या आरोपाचा ठपका; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिललाईन ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
Mahesh Gaikwad
Mahesh Gaikwadsakal

उल्हासनगर - नवि मुंबई मधील बांधकाम व्यावसायिकाने श्रीमलंगवाडीत खरेदी केलेल्या जमिनीवर बोर्ड लावून तो काढण्याच्या मोबदल्यात व्यावसायिकाकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या आरोपाचा ठपका कल्याण पूर्वेचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिललाईन ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या जीवघेण्या गोळीबारातून महेश गायकवाड यांचा जीव वाचला आहे. जमीन विषयीच्या प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गेल्या दोन महिन्यातील दुसरा गुन्हा आहे. या गुन्ह्यांमुळे महेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नवीमुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान (58) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे.

श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली येथील प्रकार

तक्रारदार सदृध्दीन खान यांनी 2009 मध्ये इक्बाल खान यांच्या ओळखीने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावातील श्यामसुंदर लक्ष्मण पाटील यांची 27 एकर जमीन महसूल विभागाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून व खरेदी विक्रीची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून जमीन खरेदी केली होती. सात बारा उतारा हा खान यांच्या नावे झाला. तक्रारदार खान यांनी 2019 मध्ये अंबरनाथ भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणी करून घेतली.

ऑगस्ट 2023 मध्ये जमीन मालक खान यांच्या जमिनीवर ‘ही जमीन महेश गायकवाड आणि इतर आरोपींच्या कब्जे वहिवाटीची आहे. या जमिनीत कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा फलक लावला होता. मालकीच्या जमिनीवरील बेकायदा फलक खान यांनी काढण्याचा प्रयत्न केला त्याला आरोपींनी विरोध केला. आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अन्यथा आम्हाला पाच कोटी द्या, अशी मागणी आरोपींनी खान यांच्याकडे केली.

सप्टेंबर 2023 मध्ये खान यांनी हिललाईन पोलिसांच्या सहकार्याने कुशीवली येथील जागेत आरोपींनी लावलेला कब्जे वहिवाटीचा फलक काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाचही आरोपींनी त्यास विरोध केला. यावेळी महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी वाहनांमधून आले. त्यांनी खान यांच्या जमिनीवर लावलेला कब्जे हक्काचा फलक काढण्यास विरोध केला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने महेश गायकवाड साथीदारांसह तेथून निघून गेले.

जमीन मालक सदृध्दीन खान यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार

मालकी हक्काची जमीन असुनही त्यावर महेश गायकवाड यांच्यासह इतर आरोपी कब्जे हक्क सांगत होते. त्यामुळे खान त्रस्त होते. नोव्हेंबर 2023 मध्ये खान कुशीवली येथील जमीन पाहणीसाठी आले त्यावेळी तेथील त्यांच्या मालकी हक्काच्या सर्वे क्रमांक 82-ब या 27 एकर जमिनीवर ‘सदर जमीन नगरसेवक महेशशेठ गायकवाड, फुलोरे यांच्या कब्जे वहिवाटीची आहे. सदर जागेत कोणीही अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा ठळक अक्षरातील फलक लावला होता.

महेश गायकवाड, फुलोरे कुटुंबिय आपल्या मालकीच्या जागेत हक्क दाखवून बेकायदा आपल्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जमिनीवरील हक्क सोडण्यासाठी पाच कोटी खंडणीची मागणी करत असल्याने जमीन मालक सदृध्दीन खान यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सचिन गवळी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com