उल्हासनगरच्या महापौर मीना आयलानी यांचा महासभेत राजीनामा

दिनेश गोगी
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

उल्हासनगर : भाजप-साईपक्ष-टीम ओमी कलानी यांच्यातील करारानुसार सव्वा वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने भाजपच्या मीना आयलानी यांनी आज सायंकाळी सातच्या सुुमारास महापौरपदाचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुुळे कलानी
परिवाराची सून पंचम कलानी यांच्या महापौरांचा मार्ग मोकळा झाला. तरी उल्हासनगरकरांचे 30 नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या शिवसेनेच्या रणनीतीकडे देखील लक्ष लागले.

महापौर मीना आयलानी यांचा कालावधी 4 जुलै रोजी संपुष्टात आल्यावरही त्या राजीनामा देत नसल्याने टीम ओमी कलानीच्या पंचम कलानी यांच्या महापौरपदाचे भिजत घोंगडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दरबारी गेले होते. त्यांना सातत्याने राजीनाम्याचे गाजर दाखवले जात असल्याने टीम ओमी कलानी-भाजपा-साईपक्षात बेबनावाचे वातावरण तयार झाले होते. अखेर आज आयलानी यांनी त्यांचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सोपविताना पाणावलेल्या डोळ्यांनी सत्ताधारी-विरोधी पक्ष व अधिकाऱ्यांचा निरोप घेतला.

कोकण आयुक्तांच्या आदेशानुसार येत्या काही दिवसात महापौरची निवडणूक होत असून करारानुसार पंचम कलानी या महापौर होणार आहेत. यात सत्तेत असलेल्या साईपक्षाची भूमिका आणि शिवसेनेची रणनीती याकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ulhasnagar Mayor Meena Ayalani Resign