उल्हासनगर : सोमवार ३० जूनपासून महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.त्यात उल्हासनगरशी निगडित १३ समस्यांची माहिती देऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी १३ तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूचना मांडल्या आहेत..या तारांकित प्रश्नात व लक्षवेधी सुचनात अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करणे.प्रमाणपत्र मिळवण्याच्या समस्या सोडवणे.शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात 202 ऐवजी 400 खाटांची क्षमता वाढवणे.उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करणे.शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाला स्थानिक औषधे खरेदी करण्यासाठी आणि ऑक्सिजन, नायट्रस आणि स्पिरिटसाठी अनुदान देणे.उल्हासनगर महानगरपालिकेतील शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर महत्त्वाची पदे तातडीने भरली जावीत..महानगरपालिका पाण्याचा स्वतंत्र स्रोत विकसित करणे,178 डी. एल. पाणी राखीव ठेवणे.शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे.शहरात चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायांना आळा घालणे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मर्यादित क्षेत्राचा विस्तार करणे..म्हारळ गावात पाणी पुरवठा योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणे,म्हारळ,वरप,कांबा गावासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करणे,प्राथमिक आरोग्य,अग्निशमन केंद्र,डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करणे,पाणी वितरणा आणि।वीज वितरणसाठ निधी देणे.लाड पागे समितीनुसार श्रेणी 3 अंतर्गत महानगरपालिकेच्या निवृत्त स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसा ची नियुक्ती करणे.शिधावाटप विभागाशी संबंधित घोटाळ्याचा तपास करणे या विषयांचा समावेश आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.