Ulhasnagar News : उल्हासनगरात साडेबारा कोटी रुपयांचा टॅक्स वसुलीचा नवा उच्चांक

मागील वसुलीच्या उच्चांकांना मागे टाकणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेने 2023-24 मध्ये साडेबारा कोटी रुपयांचा मालमत्ता कर अर्थात टॅक्स वसुलीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
Ulhasnagar Municipal Corproration
Ulhasnagar Municipal Corprorationsakal

उल्हासनगर - मागील वसुलीच्या उच्चांकांना मागे टाकणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेने 2023-24 मध्ये साडेबारा कोटी रुपयांचा मालमत्ता कर अर्थात टॅक्स वसुलीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. त्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी लागू केलेल्या 3 अभययोजनेचे पडसाद कारणीभूत ठरले आहे.

सर्वप्रथम कर वसुलीचा विक्रम 2014-15 मध्ये 103 कोटी रुपयांचा होता.हा विक्रम अबाधित असताना 2021-22 साली तत्कालीन आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी 109 कोटी 87 लाख रुपये वसुलीचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र 2022-23 मध्ये कॅपिटल व्हॅल्यू या धोरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने अवघी 64 कोटी 29 लाख रुपये वसुली झाली होती.

मात्र 2023-24 या चालू वर्षी आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता करावरील शंभर टक्के दंड माफ करण्यासाठी अभययोजनेची शक्कल लढवली. त्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये एक दिवशीय अभययोजनेत 12 कोटी, डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा 12 कोटी वसुली झाली. यावर्षी 2024 साली मात्र आयुक्त अजीज शेख यांनी एक दिवशीय नाही तर एका आठवड्याची अभययोजना लागू केली.

त्यानुसार 26 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत राबवण्यात आलेल्या या अभययोजनेत 34 कोटी 29 लाख 67 हजार रुपये वसूल झाले आहेत.या आकडेवारीमुळे चालू वर्षाची एकंदरीत वसुली 108 कोटी 70 लाखाच्या घरात पोहचू शकली होती. अशातच निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला त्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

त्यानुसार उपायुक्त प्रियंका राजपूत यांची 19 मार्च रोजी बदली झाली.पदभार सोडताना प्रियंका राजपूत यांनी आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 2023-24 मध्ये टॅक्स वसुलीचा 110 कोटी 15 लाख रुपये वसुलीचा नवा उच्चांक गाठला होता.

त्यासाठी कर निर्धारक व संकलक जेठानंद करमचंदानी,उपकर निर्धारक मनोज गोखलानी,उद्धव लुल्ला,कर निरीक्षक यांनी परिश्रम घेतले आहेत. राजपूत यांची बदली झाल्यावर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी 12 दिवसात 2 कोटी 40 लाख रुपयांची वसूली केल्याने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या वर्षात 112 कोटी 54 लाखाच्या वर टॅक्सची वसूली झालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com