पालिकेची शेवटची महासभा वादळी? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

उल्हासनगर - उल्हासनगर पालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असून, तत्पूर्वी पालिकेची अखेरची महासभा मंगळवारी (ता. 3) होत आहे. या महासभेत सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची तयार असलेली घरे देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे प्रशासनासमोर ठेवणार आहेत. या योजनेत काहींनी आपल्या जवळच्या व्यक्तींची नावे घुसवल्याची चर्चा असल्याने ती वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सादर झाल्यास शेवटची महासभा वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. 

"बीएसयूपी' योजनेंतर्गत उल्हासनगरातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी दोन इमारती बांधल्या असून, त्यात 120 फ्लॅट आहेत. ही घरे अद्याप कुणालाही दिलेली नाहीत. नगरसेविका जया साधवानी या आरोग्य सभापती असताना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या घराविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. साधवानी यांनी सुर्वे यांना ही बाब सांगितल्यावर त्यांनी महासभेत सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या घरांचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे सांगितले. या प्रस्तावाबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंमलबजावणीचा आढावा, अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या मिळकतीच्या मालमत्ता करात सूट देणे, मौजे म्हारळ येथील आरक्षण 17 मधील 1800 चौ. मी. जागेवर म.रा.वि.वि. कंपनीस रेडिरेकनर दरानुसार निश्‍चित केलेले भाडेमूल्य आकारून इलेक्‍ट्रिक सबस्टेशन उभारण्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे, राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे एकत्रीकरण करून समाज विकास विभाग तयार करण्याचा निर्णय हे विषय पटलावर मांडण्यात येणार आहेत. 

Web Title: ulhasnagar municipal corporation