

Ulhasnagar Municipal Corporation Election
ESakal
उल्हासनगर : आगामी निवडणूकांचा विचार करता सध्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उल्हासनगरमध्येही त्याची प्रचिती येत असून येथील राजकीय समिकरणही दिवसागणिक बदलत आहे. येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका निवडणुकीतील राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या संपूर्ण पॅनेलने ऐनवेळी अर्ज मागे घेत, शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उल्हासनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.