

Ulhasnagar Municipal Corporation elections
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगरचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. २०२६ च्या महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून, उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदा भाजपा आणि शिंदे गट यांची अपेक्षित राजकीय युती न घडल्याने सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. मतदारांसमोर पर्यायांची रेलचेल असून ही निवडणूक खऱ्या अर्थाने बहुरंगी ठरणार आहे.