उल्हासनगर महापालिका महापौरपदासाठी तीन उमेदवारी अर्ज 

उल्हासनगर महापालिका महापौरपदासाठी तीन उमेदवारी अर्ज 


उल्हासनगर : महानगरपालिकेत सत्तेचे वाटेकरी असणाऱ्या भाजप आणि साई पक्ष या दोघांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता महापौराच्या निवडणुकीत कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच शिवसेनेनेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. 


उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी तीन आणि उपमहापौर पदासाठी चार नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने जमनादास पुरस्वानी यांना उमेदवारी दिली असताना सत्तेतील साई पक्षाचे उमेदवार जीवन इदनानी यांनीदेखील अर्ज भरल्याने ही कोणती खेळी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांनी महापौर; तर आणि रिपाइं आठवले गटाचे भगवान भालेराव व सेनेसोबत विरोधी पक्षात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भारत गंगोत्री यांनीदेखील उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून विजय पाटील आणि साई पक्षाकडून टोनी सिरवानी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com