Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

Waldhuni River Ghat Construction : वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे उल्हासनगर महापालिकेने ३० घरांना नोटीसा बजावल्या आहेत.
Waldhuni River Ghat Construction

Waldhuni River Ghat Construction

ESakal

Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर-अंबरनाथ सीमेवरील प्राचीन शिवमंदिर परिसर आणि वालधुनी नदी सुशोभीकरण प्रकल्पामुळे एकतानगर व कैलास कॉलनीत तणाव निर्माण झाला आहे. घाट उभारणीस अडथळा ठरत असल्याचा दावा करत उल्हासनगर महापालिकेने येथील ३० घरांना अवघ्या दोन दिवसांत जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. सुमारे चार दशकांपासून येथे राहणाऱ्या कुटुंबांवर अचानक बेघर होण्याची वेळ आल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण आहे. पुनर्वसनाशिवाय घरे तोडू नयेत, या मागणीवर रहिवासी ठाम आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com