Ulhasnagar Municipal Corporation Sakal
मुंबई
Ulhasnagar Municipal Corporation : महाराष्ट्रातील कृती आराखड्याच्या मूल्यमापणात उल्हासनगर महानगरपालिका नंबर 1
Best Commissioner : १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या मूल्यमापनात उल्हासनगर महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, आयुक्त मनिषा आव्हाळे यांना ‘सर्वोत्तम आयुक्त’ म्हणून गौरवण्यात आले आहे.
उल्हासनगर : महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या मूल्यमापणात उल्हासनगर महानगरपालिका नंबर 1 ठरली असून मनीषा आव्हाळे ह्या सर्वोत्तम आयुक्त ठरल्या आहेत.ऐन महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच ही गोड बातमी मिळाल्यावर सर्व अधिकाऱ्यांनी आव्हाळे यांचे अभिनंदन केले तेंव्हा सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.

