उल्हासनगर महापालिकेचे 16 सफाई कामगार निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

उल्हासनगर  - बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणाऱ्या महापालिकेतील 16 सफाई कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नोटीस बजावूनही आदेशांचे पालन न केल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. पालिकेतील निलंबनाची ही सर्वात मोठी घटना आहे. 

पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुधाकर शिंदे यांची उल्हासनगरमध्ये बदली झाली होती. तेव्हा पनवेल आयुक्तपदाची जबाबदारी राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. डॉ. शिंदे यांनी 170 शिक्षक आणि 1250 सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या होत्या. शिक्षकांनी सुरुवातीला विरोध केल्यानंतर कारवाईचा इशारा देताच नरमाईचे धोरण स्वीकारले. बहुतांश सफाई कर्मचारीही बदलीच्या ठिकाणी हजर झाले; पण काही जणांनी नोटिसा बजावूनही आडमुठे धोरण सुरूच ठेवले. त्यानंतर डॉ. शिंदे यांची पुन्हा पनवेलला बदली झाली. निंबाळकर यांनीही पुन्हा उल्हासनगर आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांना बदली आदेशाचे उल्लंघन झाल्याचा अहवाल मिळताच 16 सफाई कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले, असे लेंगरेकर यांनी सांगितले. दुसरा अहवाल आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे देणार आहेत. त्यानंतर आजाराचे निमित्त करून कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येण्याची शक्‍यता लेंगरेकर यांनी व्यक्त केली.

Web Title: ulhasnagar municipal Workers Suspended