
उल्हासनगर : सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, बनावट कॉलर्सनी आता आशा वर्कर व अंगणवाडी सेविका कार्यकर्त्यांनाही फसवण्याचा नवा सापळा रचला आहे. दिल्ली आणि मुंबईहून आलेल्या या बनावट कॉल्समुळे उल्हासनगरमध्ये चिंता वाढली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीचा इशारा देत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.