डॉक्टरच्या हलगर्जीपणा; गर्भवती महिलेसह अर्भक बाळाचा मृत्यू

दिनेश गोगी
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

उल्हासनगरः एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी सकाळपासून ताटकळत ठेवल्याने आणि सायंकाळी ऑपरेशन केल्याने त्यात या गर्भवती महिलेसह तिच्या अर्भक बाळाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना येथील सरकारी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे.

या अनपेक्षित घटनेने संतप्त झालेल्या नातलगांनी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केल्याने एका डॉक्टरची हकालपट्टी (कार्यमुक्तता) करण्यात आली असून, महिला डॉक्टरची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

उल्हासनगरः एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी सकाळपासून ताटकळत ठेवल्याने आणि सायंकाळी ऑपरेशन केल्याने त्यात या गर्भवती महिलेसह तिच्या अर्भक बाळाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना येथील सरकारी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे.

या अनपेक्षित घटनेने संतप्त झालेल्या नातलगांनी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केल्याने एका डॉक्टरची हकालपट्टी (कार्यमुक्तता) करण्यात आली असून, महिला डॉक्टरची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

शुक्रवारी (ता. 13) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास आंबिवली येथे राहणारी आरती चव्हाण ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी उल्हासनगरातील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात आली होती. तुम्ही आंबिवली मध्ये राहत असल्याने कडोंमपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात का गेल्या नाहीत? असा सवाल या महिलेला डॉक्टरांनी केला. या ठिकाणी नाव नोंदवलेले आहे, तपासण्या देखील झालेल्या आहेत, असे सांगीतल्यावरही डॉक्टरांनी तिला प्रसूतीसाठी सायंकाळ पर्यंत ताटकळत ठेवले. तिच्या प्रसूतीकळाच्या वेदना वाढू लागल्यावर तिला तब्बल 10 तासानंतर सायंकाळी 4.30 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यात आले. हे ऑपरेशन डॉक्टर सुहास कदम, डॉ. अर्चना आखाडे करत होते.

एका तासानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले आणि आम्ही मुलाला वाचवू शकलो नाही, असे त्यांनी आरतीच्या नातेवाईकांना सांगितले. आरती व्यवस्थित असल्याचेही ते म्हणाले. मात्र, त्यानंतर अर्ध्या तासाने आरतीची प्रकृती खालावल्याने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात न्यावे लागणार, अशी धक्कादायक माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. शासकीय रुग्णवाहिका बोलावण्यात आली असे सांगून त्यांनी रात्री 9.30 वाजेपर्यंत नातेवाईकांची बोळवण केली. शेवटी खासगी रुग्णवाहिका सांगितली असे डॉक्टर म्हणाल्यावर नातलगांना संशय आला. त्यांनी आरतीला बघण्याचा हट्ट धरल्यावर आरतीचाही मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आल्यावर नातेवाईकांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.

रात्रीच आरतीचे सर्व नातलग जमा झाले. त्यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. आज दुपारी जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आरतीवर अंतिमसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात आरतीची मृतदेह ठेऊन आंदोलन केले.

'डॉक्टरची हकालपट्टी'
यासंदर्भात मध्यवर्ती सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी डॉ. सुहास कदम यांना कार्यमुक्त (हकालपट्टी) करण्यात आले आहे. डॉ. कदम हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होते. डॉ. अर्चना आखाडे यांची आरोग्य उपसंचालक यांच्या वतीने गठीत करण्यात येणाऱ्या समिती मार्फत चौकशी केली जाणार, अशी प्रतिक्रिया डॉ. नांदापुरकर यांनी व्यक्त केली.

Web Title: ulhasnagar news Doctor's defloration; death pregnant woman and child