Ulhasnagar News: पालिकेच्या सुरक्षारक्षकाने रेखाटली कुसुमाग्रजांची चित्ताकर्षक रांगोळी!

मासमीडियावर व्हायरल, कालागुणांवर शाबासकीचा वर्षाव |
Ulhasnagar News
Ulhasnagar Newssakal

उल्हासनगर येथील श्री कालिका कला मंडळाच्या कवी आणि गझलकारांच्या रंगलेल्या संमेलना प्रसंगी उल्हासनगर महापालिकेचे सुरक्षा रक्षक दशरथ जैस्वाल यांनी मराठी भाषा दिना निमित्ताने वि.वा.शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांची चित्ताकर्षक रांगोळी रेखाटली आहे.

मंडळाचे कार्याध्यक्ष व आयोजक दिलीप मालवणकर यांनी या रांगोळीला मासमीडियावर व्हायरल केल्याने दशरथ जैस्वाल प्रकाशझोतात आले असून त्यांच्यातील कलागुणांवर शाबासकीचा वर्षाव होऊ लागला आहे.(latest Ulhasngar News)

Ulhasnagar News
Ulhasnagar News : जेलमध्ये असणारे आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी राजकारणात ऍक्टिव्ह

गेल्या अनेक वर्षांपासून दशरथ जैस्वाल हे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक आहेत.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तेंव्हा जैस्वाल यांनी पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांची भेट घेऊन परवानगी मिळाली तर मी चांगल्या रांगोळ्या रेखाटू शकतो असे सांगितले.(latest Mumbai News)

कुलकर्णी यांनी जैस्वाल यांना होकार दिल्यावर दशरथ जैस्वाल यांनी लक्षवेधणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या.त्यानंतर भांडार विभागप्रमुख अंकुश कदम,मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनीही जैस्वाल यांना रांगोळ्या रेखाटण्यास सांगितले. लक्षवेधक दिसणाऱ्या या रांगोळ्यांची दखल घेणारे आयुक्त अजीज शेख यांनी अनेकदा जैस्वाल यांना प्रमाणपत्र देऊन शाबासकी बहाल केली आहे.(ulhasngar municipal corporation)

Ulhasnagar News
Ulhasnagar News: चालक खाली उतरला अन् बसचा झाला भिषण अपघात

असेच एकदा दिलीप मालवणकर हे महानगरपालिकेत आल्यावर एका रांगोळीने त्यांचे लक्ष वेधले.ही रांगोळी कुणी रेखाटली याची चौकशी केल्यावर त्यांना सुरक्षा रक्षक दशरथ जैस्वाल यांचे नाव सांगण्यात आले.(latest Maharshtra News)

कलागुणांना वाव देणारे मालवणकर यांनी दशरथला श्री कालिका कला मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कवी व गझलकारांच्या संमेलनात रांगोळी काढण्यासाठी बोलावले.आणि जैस्वाल यांनी चक्क मुसुमाग्रजांची चित्ताकर्षक रांगोळी रेखाटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी मालवणकर यांच्या पुढाकाराने संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिध्द कवी व गीतकार अरूण म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.(ulhasnagar mahanagar palika)

Ulhasnagar News
Ulhasnagar News : कामगारांच्या लढ्यासाठी नेत्याचा अर्धनग्न आंदोलनाचा लढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com