
उल्हासनगर : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ उल्हासनगर शहरात भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली होती.उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या रॅलीत सेवानिवृत्त आर्मी ऑफिसरांचा सहभाग लक्ष वेधणारा ठरला.