Ulhasnagar News : उल्हासनगरने घेतला राजकीय बॅनरबाजीतून मोकळा श्वास,आचारसंहिते नंतर महानगरपालिकेचा आक्रमक पवित्रा

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच आक्रमक पवित्रा हाती घेणाऱ्या महानगरपालिकेने उल्हासनगरात झळकवण्यात आलेल्या राजकीय बॅनर,पोस्टर्स,झेंडे काढण्याची मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे.
Ulhasnagar relief from political banners aggressive stance of Municipal Corporation after code of conduct
Ulhasnagar relief from political banners aggressive stance of Municipal Corporation after code of conductSakal

उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच आक्रमक पवित्रा हाती घेणाऱ्या महानगरपालिकेने उल्हासनगरात झळकवण्यात आलेल्या राजकीय बॅनर,पोस्टर्स,झेंडे काढण्याची मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे. या तीन दिवसात सुमारे 550 बॅनर,पोस्टर्स,झेंडे काढण्यात आले आहेत.त्यामुळे अशा बॅनरबाजीतून शहराने मोकळा श्वास घेतला आहे.

गजबजलेल्या सर्व चौकात,उल्हासनगर,शहाड,विठ्ठलवाडी स्टेशन परिसर, गोलमैदान, मार्केट,डिव्हायडर्स आदी भागात सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्ष कार्यक्रमाचे, स्वागताचे, भूमीपूजनाचे,उद्घाटनाचे,वाढदिवसांचे पोस्टर्स,बॅनर्स व झेंडे लावले होते.त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते.

अशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागताच महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी अनधिकृत आणि अतिक्रमण विरोधी पथकाचे नोडल अधिकारी व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना शहरातील बॅनर,पोस्टर्स,झेंडे काढून टाकण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार प्रभाग समिती निहाय करण्यात आलेल्या कारवाईत गणेश शिंपी,सहायक आयुक्त मनीष हिवरे,दत्तात्रय जाधव,अनिल खतुरानी यांनी शहराला बॅनर,पोस्टर बाजीतून मोकळा श्वास दिला. आचारसंहितेच्या कालावधीत महानगरपालिकेची परवानगी घेतल्या शिवाय बॅनर,पोस्टर,झेंडे लावल्यास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाताळली जाणार असा इशारा देखील गणेश शिंपी यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com