Ulhasnagar: अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या साई आर्केड इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला !

Yuvasena: जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना सुदैवाने टळली असली तरी विद्यार्थी,दुकानदार भयभीत झाले होते.
Ulhasnagar: अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या साई आर्केड इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला !

Ulhasnagar Latest Update: अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या उल्हासनगरातील नेताजी चौकामधील साई आर्केड या इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने घटनास्थळी धाव घेऊन आयुक्त डॉ.अझिझ शेख यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी निवेदन दिले आहे.

Ulhasnagar: अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या साई आर्केड इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला !
Ulhasnagar Mnp: उल्हासनगरात दुरावस्थेतील चेंबर्सची झाकणे एका फोनवर बदलणार!

साई आर्केड मध्ये अनेक कोचिंग क्लासेस,दुकाने असून न्यू इंग्लिश जुनियर कॉलेज यांचे आयटी वर्ग भरत आहेत.जवळपास एक हजार विद्यार्थी या इमारतीत क्लासेससाठी येत असतात.3 तारखेच्या सायंकाळी उशिराने इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना सुदैवाने टळली असली तरी विद्यार्थी,दुकानदार भयभीत झाले होते.

घटनास्थळी युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ म्हात्रे,अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी राज प्रकाश महाडिक,उल्हासनगर युवासेना अधिकारी अंकुश भांडे,चिटणीस वैभव गायकवाड,विभाग अधिकारी महेश घोरपडे,युवासैनिक रोनाल्ड रोझारियो,शाखाप्रमुख गणेश शिंगाडे उपस्थित होते.

Ulhasnagar: अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या साई आर्केड इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला !
Thane Ulhasnagar Crime: वाढदिवशी पार्टीमध्ये दारू कमी पडली! 'बर्थ डे बॉय'ला 3 मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकलं

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपण तात्काळ गंभीर दखल न घेतल्यास व भविष्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना किंवा जीवित हानी झाल्यास उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन याला जबाबदार राहील असे निवेदन युवासेनेने आयुक्त डॉ.अझिझ शेख यांना दिले आहे.प्लॅस्टरचा भाग कोसळल्याच्या वृत्ताला सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दुजोरा असून कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले.

Ulhasnagar: अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या साई आर्केड इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला !
Ulhasnagar: उल्हासनगरच्या भाईवर गुटक्यासाठी टोळक्याचा जीवघेणा हल्ला !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com