उल्हासनगरात दोन वैऱ्यांच्या सुनांचा महापौर पदासाठी सामना

In Ulhasnagar two enemy will face the Mayors post
In Ulhasnagar two enemy will face the Mayors post

उल्हासनगर- पप्पू कलानी - कमल भटीजा या दोन वैऱ्यांच्या पंचम कलानी व ज्योती भटीजा या सुनांचा उद्या महापौर पदासाठी आमना-सामना होत आहे. पंचम ह्या भाजपा तर ज्योती ह्या शिवसेनेच्या पाठींब्याने साईपक्षाच्या उमेदवार आहेत. त्यात व्हिपच्या धक्क्यांनी दोन्ही ठिकाणी कलाटणी मिळू लागली असून ही निवडणुक उत्कंठावर्धक बनली आहे.

पप्पू कलानी यांच्यावर घनश्याम भटीजा यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यावर घनश्याम यांचे लहान बंधू कमल भटीजा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. साईपक्ष-शिवसेना यांच्या महापौर पदाच्या उमेदवार ज्योती भटीजा ह्या घनश्याम भटीजा यांचा मुलगा प्रकाश यांची पत्नी आहे. भाजपाच्या उमेदवार पंचम कलानी ह्या पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांची पत्नी आहे. सध्या पप्पू कलानी हे इंदर भटीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. इंदर हे स्व. घनश्याम भटीजा यांचे बंधू होते.

दरम्यान, शिवसेनेच्या पाठींब्याने महापौर पदाच्या उमेदवार साईपक्षाच्या ज्योती भटीजा यांनाच मतदान करण्याचा व्हीप राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना गटनेते भारत गंगोत्री यांनी जारी केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदार तथा पंचम कलानी यांच्या सासू ज्योती कलानी यांनी वरिष्ठांकडे धाव घेतल्यावर वरिष्ठांनी महापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याचा व्हीप जारी केला आहे.

भाजपाच्या पंचम कलानी यांना साई पक्षाचे गटनेते तथा उपमहापौर जीवन इदनानी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील नगरसेवकांना पंचम कलानी यांना मतदान करण्याचा व्हीप जारी केला. मात्र, 12 नगरसेवक असलेल्या साई पक्षातील 7 नगरसेवकांना कलानी परिवाराला विरोध असल्याने त्यांनी शिवसेनेच्या पाठींब्याने ज्योती भटीजा यांना महापौरांच्या स्पर्धेत उतरवले आहे.उद्याच्या निवडणुकीत व्हिपचे पालन होते की उल्लंघन! कोण तटस्थ राहणार? कोण गैरहजर राहणार यावर सर्व निर्भर आहे.

साईपक्षातील दुसऱ्या गटामधले असलेले 7 पैकी शेरी लुंड, कंचन लुंड यांनी ओमी कलानी यांच्याशी हातमिळवणी केल्याने कुणाकडे किती मते?विरोधी पक्षात शिवसेने सोबत असलेले राष्ट्रवादी, रिपाइं आठवले, काँग्रेस, भारिप, पीआरपीचा कोणता रोल? कोण कुणासोबत याचा उलगडा देखील होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com