Ulhasnagar: मतदान संपताच सत्ताधाऱ्यांचा ‘यू-टर्न’! उल्हासनगरकरांचे ‘पाणी’ महागणार?; विशेष महासभेकडे शहराचे लक्ष

Ulhasnagar Water Price Hike: उल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात पाणी दरवाढ रद्द केल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता विशेष महासभेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
water price hike

water price hike

esakal

Updated on

उल्हासनगर : निवडणुकीच्या काळात पाणी दरवाढ रद्द केल्याचा गाजावाजा करून दिलेले आश्वासन आता हवेत विरण्याची चिन्हे आहेत. निवडणुका पार पडल्यानंतर आयोजित पहिल्याच विशेष महासभेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव अजेंड्यावर आल्याने उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) होणारी ही महासभा आता केवळ प्रशासकीय विषय न राहता राजकीय ‘विश्वासार्हतेची’ परीक्षा ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com