उमेश कोल्हे खून प्रकरण; फरार आरोपीची माहिती देणाऱ्यास NIAकडून बक्षीस जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shamim Ahmad

अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ ​​फिरोज अहमद याच्याविरुद्ध एनआयएने रोख बक्षीस जाहीर केले आहे.

उमेश कोल्हे खून प्रकरण; फरार आरोपीची माहिती देणाऱ्यास NIAकडून बक्षीस जाहीर

मुंबई - अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ ​​फिरोज अहमद याच्याविरुद्ध एनआयएने रोख बक्षीस जाहीर केले आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.

22 जून रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात 50 वर्षीय मेडिकल स्टोरचे मालक उमेश कोल्हे यांची त्याच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपी शमीम अहमदचाही पोलिस शोध घेत आहेत.

सात आरोपींना अटक

उमेश कोल्हे खून प्रकरणी यापूर्वी एनआयएने मुदस्सर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद डॉ. युसूफ खान बहादूर खान आणि कथित मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम यांच्यासह सात आरोपींना ताब्यात घेतले होते.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट आणि केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. मात्र, हे प्रकरण ‘अत्यंत संवेदनशील’ असल्याने यापूर्वी खुलासा करण्यात आला नव्हता.

Web Title: Umesh Kolhe Murder Case Nia Announces Reward Against Absconding Accused Crime Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..