Mumbai News : कारवाईसाठी जातात की गप्पा मारायला; अनधिकृत फेरिवाल्यांसोबत कर्मचारी गप्पा मारताना व्हिडीओ व्हायरल

कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत फेरिवाल्यांचा प्रश्न हा ज्वलंत विषय आहे.
unauthorised hawkers and shop official video viral social media kalyan dombivli
unauthorised hawkers and shop official video viral social media kalyan dombivliSakal

डोंबिवली - कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत फेरिवाल्यांचा प्रश्न हा ज्वलंत विषय आहे. अनधिकृत फेरिवाल्यांचे प्रस्थान दिवसेंदिवस वाढत असून त्यांना स्टेशन परिसरातून हटविणे आता पालिकेला जड जात आहे. पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक या फेरिवाल्यांवर कारवाई करण्यासाठी जाते खरे पण ते कारवाई नक्की करते हा प्रश्न एका व्हायरल व्हिडीओ मुळे उपस्थित होत आहे.

यामध्ये पालिकेचे कर्मचारी कारवाई ऐवजी चक्क फेरिवाल्यांसोबत गप्पा मारताना आढळून आले आहेत. पालिका प्रशासन याची दखल कसे घेते हे आता पहावे लागेल. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

वाहनांची गर्दी आणि दुसरीकडे फेरिवाला यामुळे नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाही. स्टेशन परिसरातील फेरीवाले हटले पाहीजे यासाठी पालिका प्रशासन या अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करत असते.

अतिक्रमण विभागाचे पथक गाडी घेऊन संबंधित ठिकाणी जाते व फेरीवाल्यांचे सामान जप्त करते. परंतु त्यानंतर ही फेरीवाले राजरोसपणे त्याच जागांवर आपला व्यवसाय करताना आढळून येतात.

यामुळे पालिकेच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतू सध्या समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ मुळे ही कारवाई नक्की कशी होते हेच जणू स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात कारवाई साठी गेलेले पालिकेचा कर्मचारी फेरिवाल्यांसोबत गप्पा मारत उभा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचाच आश्रय आहे का ? असे प्रश्न उपस्थित होते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com