esakal | नवी मुंबईत इमारतींमध्ये वाहनतळांचा अभाव
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

नवी मुंबईत इमारतींमध्ये वाहनतळांचा अभाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुर्भे : नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका (Municipal) परिसरात भूमाफियांनी कोरोना (Corona) संसर्गाचा फायदा घेत अनधिकृत (Unauthorized) इमारती (Building) वेगाने बांधल्या जात आहेत. हे बांधकाम करताना इमारतीच्या (Building) तळमजल्यावर मात्र वाहनतळाची (Parking) व्यवस्था करत नाही. त्याचे पडसाद तेथील रहिवाशांवर उमटत आहे. अनेकदा पार्किंगवरून या रहिवाशांमध्ये खटके उडत असतात.

नवी मुंबई महापालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील सिडको, एमआयडीसी, वन विभागाच्या भूखंडावर, तसेच फिफ्टी फिफ्टी या तत्त्वावर जुन्या चाळींवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभारले जात आहे. घरे घेणाऱ्या ग्राहकाकडे किमान दुचाकी असतेच; मात्र अशा इमारतींमध्ये वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याने इमारतीबाहेरील मोकळ्या जागेत वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नसतो. मोकळी जागा नसल्यास रहिवासी रस्त्याच्या दुतर्फा वाहने अवैधपणे उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जटील होत चालला आहे. काही ठिकाणी रहिवासी आपली वाहने उभी करण्याची जागा ठरवून घेतात. त्या जागेवर कुणी वाहन उभे केले तर मारहाण, भांडणासारखे प्रकार घडतात.

हेही वाचा: 'काही पक्षांना जनतेमध्ये बेसच नाही';पाहा व्हिडिओ

याशिवाय काही बांधकाम व्यावसायिक तळ मजल्यावर पार्किंगसाठी वाहनतळ बनवतात; मात्र दुचाकीशिवाय इतर वाहन त्या ठिकाणी येऊ शकत नाही. काही ठिकाणी तरी वाहनतळावर जाण्यासाठी चारचाकीसाठी रस्ताच नाही. फक्त दुचाकी जाईल इतकाच रस्ता असल्याने ही वाहने नाईलाजस्तव रस्त्यावरच पार्क करावी लागतात. त्यामुळे कायम शहरात वाहन पार्किंगचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना संपर्क केला मात्र होऊ शकला नाही

हेही वाचा: काही राज्यांमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात होण्याचे संकेत - ICMR

  • अधिकृत इमारतींमध्येही समस्या

आयुक्त अभिजित बांगर यांनी काही महिन्यांत विभागीय भागात सुरू असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळ निर्माण केले नाही, तर भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार नाही. अशा प्रकारचा इशारा दिला होता. पण जितका अधिकृत इमारतींमधील वाहन पार्किंगचा प्रश्न नाही, त्यापेक्षा अधिक अनधिकृत इमारतींमधील वाहनतळाचा प्रश्न आहे.

शहराचा विकास करताना सिडकोने भविष्यातील वाढत्या वाहनाचा विचार न केल्याने आज नवी मुंबईत वाहन पार्किंगची समस्या सर्वच स्तरावर किचकट झाली आहे. अधिकृत इमारतींना वाहनतळ असले, तर ते फक्त दुचाकीसाठी मर्यादित आहेत. त्यामुळे चारचाकी मालकांना आपली वाहने रस्त्यावर पार्क करावी लागतात.

loading image
go to top