काही राज्यांमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात होण्याचे संकेत; ICMR चा गंभीर इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

काही राज्यांमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात होण्याचे संकेत - ICMR

देशात काही राज्यांमध्ये सातत्याने कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे.

नवी दिल्ली : भारतीयांसाठी सध्याचा काळा कठीण असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी याबाबतच्या नियमावलं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. कारण, देशातील काही राज्यांमध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत असल्याचं, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) म्हटलं आहे. कारण या राज्यांमध्ये कोरोनाच्या दररोजच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

हेही वाचा: कोरोनाचा ‘सी.१.२’ व्हेरियंट संशोधकांची डोकेदु:खी का ठरला आहे?

आयसीएमआरचे डॉ. समीरण पांडा म्हणाले, "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला दोन की तीन महिने लागतील हे आपण सांगू शकत नाही. पण काही राज्यांमध्ये तिसरी लाट सुरु होत असल्याचे संकेत दिसत आहेत. सध्याचा काळ हा सणांचा काळ असून या काळात नागरिक कोविडच्या प्रोटोकॉलचं योग्यप्रकारे पालन करताना दिसत नाहीत. जर या काळात मोठ्या प्रमाणावर माणसांची गर्दी होत राहिली तर असे कार्यक्रम हे कोरोनाच्या वेगानं संसर्गासाठी कारणीभूत ठरतील"

हेही वाचा: सुमीतची कमाल! एकाच मॅचमध्ये तब्बल तीन वेळा मोडला विश्वविक्रम

दरम्यान, डॉ. पांडा यांनी एक गोष्ट नोंदवली ती म्हणजे, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी उंचीची असेल. ज्या राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला नाही त्या राज्यांमध्ये अधिकाधिक लसीकरण होण गरजेचं आहे. त्यांनी निर्बंध शिथील करण्याची घाई करु नये.

हेही वाचा: पालघरच्या मच्छीमाराचं नशीब फळफळलं, घोळ मासा बनवणार कोट्यधीश

सध्या केरळमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक झाल्याच्या स्थितीबाबत विचारलं असता डॉ. पांडा म्हणाले, "मिझोराम आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. केरळमधील बाधित लोक अतिसंवेदनशील लोकांच्या संपर्कात येत आहेत" पण केरळनं राज्यात होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नोंदी चांगल्या प्रकारे नोंदवून ठेवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: आमचेही दिवस येतील; ईडीच्या कारवाईवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आणि शाळा उघडण्याबाबत डॉ. पांडा म्हणाले, "ICMR कडून करण्यात आलेल्या सिरोसर्व्हेमधून ६ ते १७ वर्षे वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पण लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपण खूपच काळजी घेतली पाहिजे" पहिल्यांदा वयस्क लोकांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षक तसेच शाळांमधील इतर कर्मचाऱ्यांचं आधी लसीकरण व्हायला हवं, असंही डॉ. पांडा पुढे म्हणाले.

Web Title: Early Signals Of 3rd Wave Seen In Some States Says Icmr

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top