esakal | अधिकारात नसताना काढले अनधिकृत परिपत्रक; 'एसटी' महाव्यवस्थापकाचा 'महागैरकारभार' चव्हाट्यावर!
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकारात नसताना काढले अनधिकृत परिपत्रक; 'एसटी' महाव्यवस्थापकाचा 'महागैरकारभार' चव्हाट्यावर!
  • महाव्यवस्थापक माधव काळेंचा 31 मे रोजीच संपला कार्यकाळ
  •  1 मे रोजी नाव आणि सहीसह काढले अनधिकृत परिपत्रक

अधिकारात नसताना काढले अनधिकृत परिपत्रक; 'एसटी' महाव्यवस्थापकाचा 'महागैरकारभार' चव्हाट्यावर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचारी व औद्योगीक संस्था विभागाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांचा 31 मे रोजी कंत्राटी पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा मुदतवाढ न मिळताच, परिवहन मंत्र्यांच्या आदेशाचे परिपत्रक स्वत:च्या अधिकारात काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. परिवहन विभागाकडे काळे यांची मुदवाढीसाठी फाईलवर अद्याप निर्णय झालेला नसल्याचा खुलासा परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केला आहे.

भविष्यात राज्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागणार; खुद्द मंत्रिमहोदयांनीच दिली माहिती

 मंत्रालयातील उपसचिव पदावर काम करणाऱ्या माधव काळे यांना एसटी महामंडळात कर्मचारी व औद्योगीक संस्थेचे महाव्यवस्थापक म्हणून 1 मे 2019 रोजी कंत्राटी पद्घतीने नियुक्त केले होते. दरम्यान एसटी महामंडळातील सेवा जेष्ठ अधिकाऱ्यांची मात्र गळचेपी झाल्याची चर्चा यादरम्यान सुरू होती. मात्र, आता पुन्हा कर्मचारी व औद्योगीक संस्था महाव्यवस्थापक या पदावर माधव काळे यांना मुदतवाढ देणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, 31 मे रोजीच काळेंची एक वर्षांच्या कार्यकाळाची मुदत संपल्यानंतर ही, पदाचे अधिकार नसतांना, 1 जुन रोजीचे परिपत्रक काळे यांनी त्यांच्या नावाने प्रसिद्ध केल्याने एसटी अधिकाऱ्यांमध्ये मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. 

फक्त मुंबईसाठी येणार कोरोनाबाबतची नवी नियमावली? वाचा काय विचार आहे महापालिकेचा...

'एसटी'मध्ये महाव्यवस्थापक पदावर करार पध्दतीने बेकायदेशीरपणे माधव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काळे यांनी महामंडळातील सेवा, शर्ती व नियमांचा भंग करून अनेक निर्णय घेतलेले आहेत. तसेच पदाचा गैरवापर करून बदली, बढती, भरती, कामगार विरोधी निर्णय घेतलेले आहेत. याशिवाय नियोजन खात्यामध्ये असलेल्या अनेक प्रकरणामध्ये बेकायदशीरपणे निर्णय घेतलेले असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केला आहे.

तर, काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी करून माधव काळे यांची नियुक्ती रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे. 

यासंदर्भात माधव काळे यांच्याशी 'सकाळ'च्या प्रतिनिधींनी एसएमएस आणि कॉल करून प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
---------------------
काळेंना दरमहा दीडलाख पगार
एसटी महामंडळातील नियमीत अधिकाऱ्यांना दीड लाखांपर्यंतचा पगार आहे. मात्र, कंत्राटी अधिकाऱ्यांना या दर्जाचा पगार आणि सुखसुविधा नाही. मात्र, माधव काळे यांची बेकायदेशीरपणे नियुक्तीसह त्यांना दरमहा एक लाख 25 हजार वेतनावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.  

माधव काळे यांची फाईल परिवहन विभागाकडे आली आहे. अद्याप त्यांना मुदतवाढ दिली नाही. त्या फाईलवर विचार सुरू आहे. नेमक कोणत परिपत्रक काढले ते माहिती नाही. पण हे आर्श्चजनक आहे. याची माहिती घ्यावी लागेल
- अॅड.अनिल परब, परिवहन मंत्री

 

अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन
नियोजन व पणन खात्याच्या अनेक योजनांमध्ये हितसंबंध ठेवून कायदेशिररित्या महाव्यवस्थापक या पदाचा कार्यभार नसतांना, नियोजन व पणन या खात्यातील कंत्राटांवर सह्या करून कंत्राटदारांचे हित जोपासले आहे. त्यामूळे काळे यांनी त्यांच्या काळात घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयांची उच्च स्तरीय चौकशी करून कायदेशी कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.

loading image
go to top