पालिकेच्या दूर्लक्षामुळे नवी मुंबईत अनाधिकृत होर्डिंगबाजीला ऊत; फुकटे जाहिरातदार सुसाट

पालिकेच्या दूर्लक्षामुळे नवी मुंबईत अनाधिकृत होर्डिंगबाजीला ऊत; फुकटे जाहिरातदार सुसाट


वाशी: महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत नवी मुंबईत बेकायदा होर्डिंगबाजीला दिवाळीत अक्षरक्ष: ऊत आला. महापालिकेची आगामी निवडणूक त्यासाठी निमित्त ठरली. 

उच्च न्यायलयाने अनाधिकृत होर्डिगबाजी करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर होर्डिंगबाजी खपवून घेणार नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मोठी कारवाई होताना दिसत नाही. 
नवी मुंबईला स्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत. मात्र, फुकट्या होर्डिंगबाजांचे चांगलेच फावले आहे. यंदा दिवाळी दुसरा शनिवार व रविवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशीच आल्यामुळे राजकीय नेत्याकडून बेकायदा होर्डिगबाजीला ऊत आला आहे, असे नागरिक सांगतात. या संदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याशी संपर्क झाला नाही.  

कुठे कुठे विद्रुपीकरण 
ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, बेलापुर व तुर्भे या भागात मोठ्या प्रमाणात विनापरवाना होल्डींग लावण्यात आले आहेत. वाशी येथील अभ्युदय बॅंकेच्या समोरील चौकात ही विविध पक्षाच्या शुभेच्छा फलकांची एकच भाऊगर्दी झाली आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणेतील डी मार्ट चौकात, ऐरोली रेल्वे स्टेशन नजीक, ऐरोली स्कॉय वॉक, ऐरोली सेक्‍टर 19 चौक, गोठिवली गावातील चौक आदी परिसरात सुध्दा होल्डींग आहेत. 

नवी मुंबईत अनधिकृत होल्डिंग असतील, तर तत्काळ हटवण्यात येतील. याबाबत सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील. उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्ल्डिंगच्या विरोधात दिलेल्या आदेशानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. 
- अभिजित बांगर,
आयुक्त, महापालिका 

Unauthorized hoardings in Navi Mumbai due to municipal negligence

---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com