जादूटोण्याच्या संशयावरून काकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

कळवा : शीळ डायघरमधील पिंपरी गाव दहिसर ठाकूर पाडा येथे डोंगराच्या पायथ्याशी शुक्रवारी सकाळी ४५ वर्षीय नागरिकाची धारधार शस्त्राने हत्या केली होती. याप्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी शनिवारी (ता.१६) दोघांना अटक केली असून त्यात मुख्य आरोपी मृत तरुणाचा पुतण्या आहे.

पिंपरी गाव दहिसर येथे राहणारे मयत विष्णू किसन नागरे (४५) याने त्यांचा भाऊ कृष्णा यास दोन वर्षांपूर्वी जादूटोणा करून मारले, असा त्यांचा पुतण्या अमित यास संशय होता. या संशयातून शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मयत विष्णू यांचा पुतण्या आरोपी अमित नागरे (१९) व त्याचा मित्र अमर शर्मा (२२) या दोघांनी विष्णू यांची दहिसर ठाकूर पाडा येथील विजय स्टोन या दगडखाणीमागे धारधार शस्त्राने त्याची हत्या करून फरारी झाले होते.

त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. शीळ डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांनी चोवीस तासांच्या आत आरोपी अमित व अमर यास दहिसरमधून अटक केली. या संदर्भात शीळ डायघर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle's murder on suspicion of witchcraft