17 हून अधिक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजेस, तब्बल 300 व्हिडीओ अपलोड करून कमवले 2 कोटी

17 हून अधिक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजेस, तब्बल 300 व्हिडीओ अपलोड करून कमवले 2 कोटी

मुंबई : विचित्र व खोडसळ व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली महिला व बालकांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते यू ट्यूब चॅनल्स द्वारेप्रसारित करून कोट्यावधी रुपयांची कमाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बीकेसी सायबर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मुकेश फुलचंद गुप्ता (29 वर्ष ), प्रिन्स कुमार राजू साव (23 वर्ष ) आणि जितेंद्र बैचेतराम गुप्ता (25 वर्ष ) अशी त्यांची ओळख पटली आहे.

सध्या यू टयुबवर सार्वजनिक ठिकाणी अयोग्य पद्धतीने स्त्री देहाचे प्रदर्शन करून महिलांबाबतचे अश्लील व्हिडीओ प्रसारित करून आर्थिक लाभ मिळविण्याची नवीन पद्धत उदयास आली आहे. या प्रकारणात एक मोठी टोळी कार्यरत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडून बी.के.सी. सायबर पोलीस ठाण्याकडे केली होती.

अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ मुंबईतील मरीन लाईन्स, बांद्रा फोर्ट, अक्सा, गोराई, जुहूबीच, बालाजी गार्डन, कांदिवली व इतर ठिकाणी चित्रीत करण्यात आले आहेत. यातील काही व्हिडीओमध्ये महिलांशी अश्लील चाळे, स्पर्श, अश्लील शेरेबाजी  करण्याकरिता बालकांचादेखील वापर  केला जात असल्याचे दिसून आले.

त्यानुसार याप्रकरणी बीकेसी सायबर पोलिसठाण्यात यातील आरोपींविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर यातील आरोपींचा शोध लावला. यातील तिघेआरोपी ठाणे, मालाड पूर्व येथे राहणारे असून त्यांनी  अनेक यू टयुब चॅनल्स तयार केले आहेत. त्या चॅनल्सवर अंदाजे 300 पेक्षा अधिक अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा उलघडा झाला आहे. अटक आरोपी या व्हिडीओमधील काही मुलींकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे जबरदस्तीने काम करून घेत होते. पोलिस या प्रकरणाच सखोल तपास करीत आहेत.

याप्रकरणी आतापर्यंत पाच मुलींनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला मुकेशला 10 वीला 98 टक्के मार्क मिळाले होते. हा या प्रकरणातील मास्टर माईंट असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी 17 हून अधिक यूट्यूब चॅनल्स बनवले आहेत. त्याच्या सहाय्याने दोन कोटी रुपये बनावले आहेत. आरोपींनी बनावलेल्या 300 अश्लील चित्रफीतींना 15 कोटीहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. अशा प्रकारचे ग्रुप दिल्ली, झारखंड येथेही सक्रिय असून याबाबत पोलिसांनी संबंधीत समाज माध्यमांशी संपर्क साधून हे अश्लील व्हिडीओ काढण्यीच विनंती केली आहे.

under the tag of pranks youngsters from mumbai uploaded obscene videos of girls and women 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com