भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

दहिसर ते मिरा-भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो- ९ (मेट्रो- ७ चा विस्तार) मार्गिकेवर एमएमआरडीएने भूमिगत मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. यासह इतर पूर्वकामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये दहिसर ते मिरा-भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो- ९ (मेट्रो- ७ चा विस्तार) मार्गिकेवर एमएमआरडीएने भूमिगत मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. यासह इतर पूर्वकामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

ही बातमी वाचली का? बारावीचा अभ्यासक्रम बदलणार; पाहा काय असेल बदल...

दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा मेट्रो- ७ मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. या मेट्रो- ७ मार्गिकेचा विस्तार म्हणजेच मेट्रो- ९ ही मार्गिका आहे. दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अंतर १३.५४ किमी इतके असणार आहे; तर मेट्रो ७ ए एकूण ३.१ किमी असून, त्यापैकी २.१ किमीचा भाग भूमिगत असणार आहे. दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो- ९ मार्गिकेवर एकूण ११ स्थानके आहेत. या प्रकल्पाचा खर्च ६ हजार ६०७ कोटी रुपये इतका आहे. या मार्गिकेला मंजुरी मिळाली असल्याने लवकरच बांधकामही सुरू करण्यात येणार आहे.

ही बातमी वाचली का? रसायनीत हिरव्या रंगाचे पाणी

ही कामे सुरू 
मेट्रो- ९ या मार्गिकेवर बॅरिकेड्‌स बसवण्यात आल्या असून, इतर पूर्व कामे म्हणजेच माती परीक्षण, सर्वेक्षण, पाईप लोड अशा कामांना सुरुवात करण्यात आली असल्याचे एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The underground metro project will be accelerated