Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

ठाणे खाडीखाली भारतातील पहिल्या रेल्वे बोगद्याचे काम गतीत; १० किमीपैकी ७ किमी बोगदा समुद्राखालून
TBM Machine

TBM Machine

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याच्या उभारणीला वेग आला आहे. ठाणे खाडीखाली समुद्राच्या तळातून जाणाऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सावली (घणसोली) येथून दुसऱ्या टनल बोरिंग मशीनने (टीबीएम) शनिवारी काम सुरू केले. १० किलोमीटरच्या या टप्प्यातील तब्बल ७ किलोमीटरचा बोगदा समुद्राखालून जाणार असून, भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा पहिलाच समुद्राखालील रेल्वे बोगदा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com