कोरोना संसर्गामुळे दाऊदचा मृत्यू? यावर पोलिस काय म्हणतायत, वाचा... 

कोरोना संसर्गामुळे दाऊदचा मृत्यू? यावर पोलिस काय म्हणतायत, वाचा... 

मुंबई, अंधेरी: सध्या कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम याच्या मृत्युच्या बातम्या येत आहेत. तर सद्यस्थितीवरुन दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी दाऊदच्या मृत्युची बातमी मुद्दामहून पसरवली जात असल्याचे मत आजी-माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

दाऊद इब्राहीम आणि त्याची पत्नी मेहजबीन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी कराचीच्या लष्करी रुग्णालयात दाखल केले असून दाऊदच्या सुरक्षारक्षकांना क्वारंटाईन केल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या होत्या. तर शनिवारी कोरोनामुळे दाऊदचा मृत्यू झाल्याच्या अफवा जोरात उठल्या आहेत. मात्र पाकिस्तानच्या कुठल्याही वृत्तपत्राने किंवा वृत्तवाहिनीने या संदर्भात एकही बातमी दिलेली नाही. कुठल्याही एक्स्पर्टने या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

दाऊदच्या बातमीतील सत्य काय

यापूर्वीही वेळोवेळी दाऊद संदर्भात अनेक वेगवेगळ्या बातम्या आल्या होत्या. लोकांच्या मनात कोरोनाची भीती वाढल्याने कोरोनावरून त्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच अशा अफवा पेरण्यात येतात. यामागे काही राजकारणी असण्याचीही शक्यता आहे, असे प्रतिक्रिया अंडरवर्ल्ड जवळून बघितलेल्या एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर दिली आहे.

कोरोना झाला असेल पण मृत्यचे वृत्त खोटे

सध्या दहशतवाद विरोधी पथकातील एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने कोरोनामुळे दाऊदचा मृत्यू झाला, हे वृत्त साफ खोटे असल्याचे म्हटले आहे. कदाचित दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी खरीही असू शकते. मात्र मृत्युची बातमी शंभर टक्के खोटी असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

बातमी ट्विटरवर ट्रेंडिंग

दाऊद संदर्भातील बातम्या समाज माध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारित होत असताना, पाकिस्तानच्या एकाही वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीने या बातम्यांची दखल घेतली नाही. किंवा या वृत्ताबद्दल प्रतिक्रीया दिलेली नाही. ट्विटवरही दाऊदची बातमी ट्रेडिंग होती. 

दाऊद पाकिस्तानमध्ये आहे, हे जगाला ठाऊक आहे. मात्र पाकिस्तान दाऊदला कधीही भारताच्या हवाली करणार नाही, हे राजकारण्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे त्याच्या मृत्युसंदर्भातील अफवा कायम उठत असतात. अनेक लोकांसाठी ते सोयीचेही आहे. - पी. के. जैन, निवृत्त आयपीएस अधिकारी

is underworld don dawood ibrahim really dead read what police officers are saying

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com