Big News - 'तो' पाकिस्तान्यांना द्यायचा आपल्या पाणबुड्यांची माहिती...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

विशाखापट्टणम येथील हेरगिरीप्रकरणात पैसे पुरवणा-या प्रमुख आरोपीला राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) मुंबईतून अटक केली

मंबई : विशाखापट्टणम येथील हेरगिरीप्रकरणात पैसे पुरवणा-या प्रमुख आरोपीला राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) मुंबईतून अटक केली. अब्दुल रेहमान अब्दुल जब्बार शेख (53) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या घरात राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत अद्ययावत उपकरण व कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली.

त्याच्यावर नौदलाच्या 11 व्यक्तींच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला गुप्त माहिती दिल्याचा आरोप आहे. शेख याच्यासह त्याची पत्नी शाहिस्ता कैसर या दोघांनी घातपाती कारवायांसाठी पैसे पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शाहिस्ताला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. ती मूळची पाकिस्तानी नागरिक आहे.

सर्वात मोठी बातमी : मुंबईतील कोरोनाची इतिहासात होणार नोंद, 'ही' माहिती जपून ठेवली जाणार...

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला गुप्त माहिती पुरवणाऱ्या  रॅकेटचा भारतीय गुप्तचर संघटनांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी मोहम्मद हारून हाजी अब्दुल रेहमान लकडावाला या मुंबईतील रहिवाश्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो या कटात सामील असल्याचे निष्पन्न झाले होते. शेखच्या अटकेमुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे.

बापरे! मुंबईतून गावी गेलेल्या स्थलांतरितांची उत्तर प्रदेशात दहशत; तब्बल 'इतके' जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह..

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या अधिका-यांनी त्याला गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सामील करून घेतले होते. भारतीय नौदलाच्या बोटी, पाणबुड्यांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येत होता. त्यावेळी समाज माध्यमांच्या मदतीने 11 नौदलाच्या व्यक्तींच्या संपर्कात आले. पैशांच्या बदल्यात त्यांच्याकडून माहिती घेतली जायची. भारतातील हस्तकाच्या मदतीने या नौदल अधिकारी व कर्मचा-यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते. 

NAI captured abdul rehman abdul rehman sheikh for giving confidential information of indian navy to pak


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NAI captured abdul rehman abdul rehman sheikh for giving confidential information of indian navy to pak