झटपट श्रीमंत होण्याच्या नादात बेरोजगार तरुणांनी लुटली बँक, पोलिसांनी आवळल्या मूसक्या

विक्रम गायकवाड
Saturday, 18 July 2020

या आरोपींना पकडण्यासाठी पाच वेगवेगळी पथके तयार केली होती. न्यायालयाने या दोघांना येत्या 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.  

नवी मुंबई : पिस्तूल आणि चाकूच्या धाकाने कोपरखैरणे सेक्टर-19 मधील सारस्वत बँकेतील चार लाख 12 हजारांची रोख रक्कम लुटून नेणाऱ्या भूषण दीपक चौधरी (26), स्वप्नील शेषराव सपकाळ (18) या दोघांना चेंबूर येथून जेरबंद करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले. या दुकलीकडून 68 हजारांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला सुरा व पिस्तूलसारखे हत्यार हस्तगत केल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी दिली.  

मोठी बातमी : खलिस्तानवादी ट्विटबाबत ट्विटरला नोटीस... 

भूषण आणि स्वप्नील हे दोघेही चेंबूर येथे राहण्यास असून, दोघेही बेरोजगार असल्याने कमी वेळेत अधिक पैसे मिळवण्यासाठी त्यांनी कोपरखैरणेतील सारस्वत बँक लुटण्याची योजना बनविली होती. त्यासाठी मागील दोन महिन्यांपासून या दोघांनी बँकेवर पाळत ठेवली होती. त्यासाठी हे दोघेही व्यावसायिक कर्ज मिळविण्याच्या बहाण्याने बँकेत जाऊन रेखी करून यायचे. कर्मचाऱ्यांना चाकूचा व पिस्तूलचा धाक दाखवून लॉकररूम व कॅशिअरजवळ असलेली रोख चार लाख 12 हजारांचा रक्कम लुटून पोबारा केला होता.

नक्की वाचा : कल्याण-डोंबिवलीत पालिकेने हाती घेतली विशेष मोहीम, कोरोना संशयित रुग्णांना मिळणार वेळीच उपचार

याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी या आरोपींना पकडण्यासाठी पाच वेगवेगळी पथके तयार केली होती. न्यायालयाने या दोघांना येत्या 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.  

(संपादन : वैभव गाटे)

unemployed youths robbed a bank in navi mumbai read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unemployed youths robbed a bank in navi mumbai read full story