ठाणे - मुरबाडमधील पाणपोई अनोळखी व्यक्तीने तोडली

मुरलीधर दळवी
मंगळवार, 8 मे 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड शहरातील  न्यु इंग्लिश स्कुल जवळ मुख्य रस्त्यावर नागरिक व विद्यार्थ्यांसाठी नगरसेविका साक्षी संतोष चौधरी यांनी बांधलेली पाणपोई अनोळखी इसमाने तोडून टाकली आहे.

ऐन उन्हाच्या तडाख्यात पाण्याची तहान भागवणाऱ्या पाणपोई वर कुणी तरी तोडफोड केल्याने याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात अनोळखी  ईसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरबाड बाजार पेठेतील मुख्य रस्त्यालगतची ही जागा अनधिकृत बांधकामासाठी अनेकांच्या नजरेत होती लोकांच्या उपयोगासाठी नगरसेविका साक्षी चौधरी यानी या ठिकाणी पाणपोई बनविली व  31 डिसेंबर 2017 रोजी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले होते.

मुरबाड शहरात खेडेगावातून येणारे नागरिक व शेजारच्या न्यू इंग्लिश स्कुल मधील विद्यार्थी या पाणपोईचा उपयोग करत होते परंतु कोणीतरी विकृत माणसाने पाणपोईची तोडफौड केली किंवा  हा राजकीय वाद असल्याची चर्चा मुरबाड मध्ये होत आहे पोलिस व नगरपंचायत याबाबत काय भुमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे  

Web Title: unidentified man broke watertank in murbaad