विद्यार्थ्यांसाठी 83 कोटींचे गणवेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक वर्षात 83 कोटींची गणवेश खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची लवकरच मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक वर्षात 83 कोटींची गणवेश खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची लवकरच मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.

गणवेश खरेदीसाठी ई-निविदा मागवण्यात आल्या होत्या. पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी हाफ पॅण्ट, हाफ शर्ट, रुमाल, पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी फुल पॅण्ट, हाफ शर्ट, टाय आणि रुमाल, पहिली ते चौथीच्या मुलींसाठी पिनो फ्रॉक, ब्लाऊज, बॅज, टाय, रुमाल, हेअर बॅण्ड, पाचवी ते दहावीतील मुलींसाठी सलवार (पॅण्टच्या रंगाची), कमीज (शर्टच्या कपड्याचे) बॅज, रुमाल, रिबिनी असे गणवेशाचे स्वरूप आहे. चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी टेक्‍नोक्राफ्ट असोसिएटला गणवेश पुरवण्याचे काम दिले जाण्याची शक्‍यता आहे.

प्रत्येक शाळेत गणवेशाची मागणी नोंदवल्यापासून 45 दिवसांत गणवेश पुरवण्याचे आदेश पुरवठादाराला देण्यात येतील. नाकारण्यात आलेले गणवेश संच पुरवठादाराने बदलून द्यावेत, अशी अटही आहे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. या कंपनीने बनवलेले गणवेश देणे पुरवठादाराला बंधनकारक आहे. कामात कसूर केल्यास खरेदीच्या 20 टक्के रक्कम दंड म्हणून पुरवठादाराकडून घेण्यात येईल. 83 कोटी 60 लाख इतकी विद्यार्थ्यांच्या गणवेशांची एकूण किंमत आहे.

Web Title: uniform for student