esakal | #UnionBudget2020 : बाकी काही नको, फक्त नोकरी द्या..
sakal

बोलून बातमी शोधा

#UnionBudget2020 : बाकी काही नको, फक्त नोकरी द्या..

#UnionBudget2020 : बाकी काही नको, फक्त नोकरी द्या..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२० रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या अर्थसंकल्पामुळे सरकारसमोर मोठं आव्हानं असणार आहे. सामान्य जनतेला या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. एकीकडे आर्थिक मंदीच सावट देशावर घोंगावतंय तर दुसरीकडे सरकारला आता यातून मार्ग काढत आर्थिक बजेट सादर करायचं आहे . पण  देशातल्या तरुण पिढीला या बजेट कडून एकमेव अपेक्षा आहे आणि ती  म्हणजे नोकरी. सरकारने काही ही बाकी आश्वासन दिल नाही तरी चालेल, मात्र नोकत्या उपलब्ध करून द्या असं मुंबईतील तरुण पिढीचं म्हणणं आहे.

मोठी बातमी - मला 'नाईट लाईफ' हे शब्दच आवडत नाही - उद्धव ठाकरे 

देशात एकूण ६० करोड तरुण आहेत, यामध्ये ५० लाख विद्यार्थी दरवर्षी ग्रॅजुएट होत असतात. अशात विद्यार्थ्यांच्या तुलनेत देशात नोकऱ्या उपलब्ध नसल्याने तरुण पिढी सध्या प्रचंड तणावात असल्याचं पाहायला मिळतंय. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या पहिल्या बजेटमध्ये सरकार तरुण पिढीच्या स्किल ट्रेनिंगवर भर देणार असं सांगितलं गेलं होतं. मात्र आकडे काही वेगळच सांगतात.


काय  सांगतात बेरोजगारीचे  आत्ताचे आकडे:

  • उत्तर प्रदेशमध्ये २०१८ साली ५.९१ टक्के इतकी बेरोजगारी होती मात्र आता २०१९मध्ये ९.९५ टक्के इतकी झालीये.  बेरोजगारी २०१८च्या  दुपटीने वाढल्याच चित्र दिसून येतय.
  • महाराष्ट्रात २०१८ मध्ये बेरोजगारी ३.८१ टक्के होती ती आता ४.८७ टक्के झालीये.
  • बिहारमध्ये २०१९ मध्ये बेरोजगारी ७.८४ टक्क्यावरून तब्बल ११.४७ टक्के इतकी झालीये.
  • याउलट यश्चिम बंगालमध्ये बेरोजगारी २०१८ च्या तुलनेत कमी झालेली दिसते. २०१८ मध्ये  ७.०५ टक्के इतकी होती मात्र २०१९ मध्ये ६.३६ टक्के इतकी आहे.

मोठी बातमी - मंगलप्रभात लोढा यांची फडणवीस करणार हकालपट्टी ?

एकूणच संपूर्ण भारतात सुशिक्षित तरुणांपैकी एक मोठा वर्ग बेरोजगार आहेत. त्यामुळे  आता येत्या बजेटकडून तरुण पिढी इतर गोष्टींच्या तुलनेत नोकरीला प्राधान्य देताना पहिला मिळतेय.

union budget 2020 youngsters want nothing but jobs