अमित शहा यांच्या दौऱ्यात राजकीय बैठकांवर फुली

मुंबईत येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोमवारच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
Amit Shah Mumbai Visit
Amit Shah Mumbai Visit

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबईत येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोमवारच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असले. भाजपच्या नेत्यांची बैठक ते घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शहा हे केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्षांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

राजकीय बैठका घेण्याबाबत पक्षाच्या नेत्यांनी आग्रह करूनही त्यावर शहा यांनी निर्णय घेतलेला नाही. या दौऱ्यात अन्य दोन कार्यक्रमांना उपस्थित राहतील. महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्याने राजकीय घडामोडींना वेग येत आहेत. राज्याच्या सत्तांतरानंतर शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही चितपट करण्याची भाजपची विशेषत: शहा यांची रणनीती आहे त्यादृष्टीने मुंबई भाजपचे अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे देऊन कामाला सुरुवात केली आहे. अशात शहा हे उद्या मुंबईत येत आहे.

बावनकुळे यांची पुन्हा दिल्ली वारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुन्हा एकदा दिल्लीला गेले आहे. प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यापासून बावनकुळे यांचा हा दुसरा दौरा आहे. राज्यातील राजकीय स्थिती, पुढच्या निवडणुका आणि त्यासाठीची रणनीती या बाबींवर ते वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com