विद्यापीठांत 30 टक्के पदे कपातीचा घाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यातील बिगर कृषी विद्यापीठांतील 30 टक्के पदे कमी करण्याचा घाट उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घातला आहे. या निर्णयाविरोधात मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या तिन्ही संघटना एकवटल्या आहेत. सरकारला जाब विचारण्यासाठी स्थापन झालेल्या राज्यव्यापी कृती समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील बिगर कृषी विद्यापीठांचा आढावा घेऊन पदांचा आकृतिबंध ठरवताना 30 टक्के पदांची कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा परिणाम विद्यापीठांच्या कामकाजावर होण्याची शक्‍यता आहे.

त्याचप्रमाणे सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचा 2011 मधील रद्द केलेला सरकारी निर्णय कायम करण्यासाठी सर्व बिगर कृषी विद्यापीठांमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Web Title: University 30 Percentage post reduction