बाईकने पाठलाग करत आलेत आणि मनसे पदाधिकाऱ्याच्या डोक्यात गोळी झाडून निघून गेलेत; ठाण्यातील भीषण घटना

बाईकने पाठलाग करत आलेत आणि मनसे पदाधिकाऱ्याच्या डोक्यात गोळी झाडून निघून गेलेत; ठाण्यातील भीषण घटना

ठाणे : ता, 23 : ठाण्यातील राबोडी परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमिल शेख यांची यांची अज्ञात इसमाने भर दिवसा डोक्यात गोळी झाडून हत्या केलीये. सदर घटना आज (सोमवार)  घडली आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी जमील शेख यांची हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली हे मात्र अद्यापही समजू शकले नाही.

ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे जमील शेख हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, ते त्याच परिसराचे प्रभाग अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. आज (सोमवारी) दुपारी ते दुचाकीने घरी जात  होते. अशात राबोडी येथील महापालिका शाळेजवळ त्यांचा पाठलाग करत दुचाकीवर दोघे जण आलेत. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून भर रस्त्यात दिवसाढवळ्या गोळी झाडली.

गोळी झाडल्याबरोबर जलील हे त्याक्षणी गाडीवरून कोसळले. गंभीर अवस्थेत असलेल्या जमील यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. त्या आधारे पोलिस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

तसेच या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

( संपादन - सुमित बागुल ) 

unknown men followed MNS party worker jameel sheikh in rabodi thane and shot him

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com