esakal | संजय राऊत मुख्यमंत्र्यांना थेट बोलले, थोडे डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत!
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत मुख्यमंत्र्यांना थेट बोलले, थोडे डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत!

या व्हिडिओत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल विचारला. त्यात संजय राऊत म्हणतात की, थोडे डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत मला, हा गेल्या सहा महिन्यातला परिणाम आहे का?, यावर मुख्यमंत्री मनापासून हसताना दिसतात.

संजय राऊत मुख्यमंत्र्यांना थेट बोलले, थोडे डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत!

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. येत्या २७ जुलैला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं दरवर्षी संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत असतात. त्याप्रमाणे याही वर्षी ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीबद्दल राऊत यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केलं आहे. 

या व्हिडिओत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल विचारला. त्यात संजय राऊत म्हणतात की,  थोडे डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत मला, हा गेल्या सहा महिन्यातला परिणाम आहे का?, यावर मुख्यमंत्री मनापासून हसताना दिसतात.

तसंच 'तुम्ही काहीतरी लपवताय' असंही वाक्य संजय राऊतांनी या व्हिडिओत म्हटलंय.  व्हिडिओच्या ट्रेलरमध्ये ते मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारत आहेत आणि तुम्ही काहीतरी लपवत आहात, असंही बोलताना दिसत आहेत. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओतील काही प्रश्नांमुळं मुलाखतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २५ आणि  २६ जुलै रोजी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. 

या मुलाखतीत उद्धव ठाकरे एक मुख्यमंत्री म्हणून बोलतील, कारण आजपर्यत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुलाखत द्यायचे यावेळी मात्र शिवसेना पक्षप्रमुखसोबतचं ते राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे.  याच पार्श्वभूमीवर देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्नं आणि सध्या कोरोनाचं संकट यावर ही मुलाखत असेल. 

अधिक वाचाः रेल्वेची रहदारी वाढली हॅनकॉक पुलाचे काम पुन्हा रखडले! रेल्वे अधिकारी म्हणतात की,...

सरकारच्या सहा महिन्याच्या काळाकडं तुम्ही कसं पाहता? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार? महाराष्ट्रात सैन्याला पाचारण करावं असं आपल्याला कधी वाटलं होतं का? करोनाच्या काळात आपण मंत्रालयात कमीत कमी गेलात, असं का? अंतिम वर्षाच्या परीक्षेचं काय?,' असे अनेक प्रश्न या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांवर मुख्यमंत्री काय उत्तरं देतात हे प्रत्यक्ष मुलाखत प्रसारित झाल्यावरच समजेल. 

हेही वाचाः  मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नाव नोंदणी

गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊतांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शरद पवारांनी बऱ्याच प्रश्नांची चोख उत्तरं दिली होती. एकच शरद सगळे गारद असं या मुलाखतीचं मुख्य शीर्षक होतं. ही मुलाखत ३ भागांमध्ये प्रसारित केली होती. या मुलाखतीत कोरोना महामारी, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, चीनचा प्रश्न, केंद्र सरकार या आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी मुलाखतीत चर्चा केली होती.

Unlock Interview CM Uddhav Thackeray talked with Sanjay Raut Saamana promo 2